Swargarohini: Swargavar Swari

Share
 • Ships within 5 days
  ₹ 300
  Description

  "Swargarohini: Swargavar Swari" By Prof. Kshitij Patukale

  Publish Date: 21 May 2016
  Price: 400/- Discount Price: 350/-
  Book will be delivered within 5 days..
  Kardaliwan Seva Sangh, Pune - 9657709678

  स्वर्गारोहिणीविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. महाभारतामध्ये स्पष्ट उल्लेख आहे कि अवतार समाप्तीच्यावेळी पांडव याच मार्गाने स्वर्गाकडे गेले. बद्रीनाथ मंदिराच्या मागे ३९ किमी अंतरावर नर आणि नारायण पर्वतरांगांच्या विळख्यात स्वर्गारोहिणी हे ठिकाण आहे.
  प्रा. क्षितिज पाटुकले यांनी दोन वेळा स्वर्गारोहिणीला प्रत्यक्ष भेट देवून आणि अनेक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून “ स्वर्गा रोहिणी : स्वर्गावर स्वारी ” हे पुस्तक लिहले आहे. यात स्वर्गारोहिणीच्या कहाणीबरोबरच तीची परिक्रमा कशी करतात याचे सविस्तर वर्णन केले आहे. याचबरोबर देवभूमी उत्तराखंडातील अनेक अज्ञात ठिकाणांची माहिती दिली आहे. यामध्ये पंच कैलास, पंच बद्री, पंच केदार, पंच प्रयाग, आणि चारधाम व इतर महत्त्वाच्या तीर्थस्थानांची माहिती दिली आहे. याचबरोबर देवभूमीतील ट्रेकिंग आणि माऊंटेनिअरिंग ( विविध जगप्रसिद्ध ट्रेक ) रिव्हर क्रॉसिंग, रिव्हर राफ्टिंग, व्हॅली क्रॉसिंग आणि बर्फावरून घसरण्याचा स्किईंग अशा साहसी खेळांबद्दलही माहिती दिली आहे. प्रत्येकाकडे असलेच पाहिजे असे हे पुस्तक आहे.
  बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिर समितीचे प्रमुख श्री. बलदेव सिंग यांची प्रस्तावना लाभली असून त्यांच्याच हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन २१ मे २०१६ रोजी पुणे येथे होणार आहे.

  पुस्तकाचा ट्रेलर युटूबवर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
  https://www.youtube.com/watch?v=UlYZ0oHGeX4