साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या २२ मे २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/
२२ मे २०२०च्या अंकात काय वाचाल?
संपादकीय : वीस लाख कोटींच्या गोष्टीचे तात्पर्य काय?
मुखपृष्ठकथा : वीस लाख कोटींची गोष्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी जाहीर केलेले वीस लाख कोटींचे पॅकेज कितपत उपयोगी पडेल, महाराष्ट्राला आणि कोकणातील जनतेला त्याचा नेमका कोणता लाभ होणार, या पॅकेजबरोबर आणखी काय व्हायला हवे होते, याची सांगोपांग चर्चा करणारा, राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख...
पॅकेजमुळे प्रदूषणकारी औद्योगिकीकरणालाच चालना : भारतीय जीवन आणि पृथ्वीरक्षण चळवळीचे निमंत्रक अॅड. गिरीश राऊत यांचा लेख...
करोनात भेटलं शिवलं! : २२ मे रोजीच्या जैवविविधता दिनानिमित्त कोकणातील जैवविविधतेची झलक दर्शविणारा धीरज वाटेकर यांचा लेख...
भटाची कोंड : विवेक (राजू) परब यांचा मालवणी बोलीतील ललित लेख...
जा, पाखरा जा... : अशोक प्रभू यांनी लिहिलेला स्मरणरंजनपर लेख...
बालकथा : गोष्ट वाघाच्या मिश्यांची... भावना मेनन यांच्या कथेचा अश्विनी कांबळे यांनी केलेला अनुवाद
राजाभाऊ लिमयेंनी जागवल्या राजीव गांधींच्या आठवणी...