साप्ताहिक कोकण मीडिया - १७ एप्रिल २०२०

Share
  • Document
  • 10 MB
Free
Description

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या १७ एप्रिल २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/
१७ एप्रिल २०२०च्या अंकात काय वाचाल?

संपादकीय : आढावा बैठका आणि दौरे आधी थांबवा....

मुखपृष्ठकथा : हेल्पिंग हँड्स : करोनालढ्यातील मानवी साखळी
सहकार रुजत नाही असे म्हटले जाणाऱ्या कोकणात तब्बल २९ संस्था एकत्र येऊन 'हेल्पिंग हँड्स' नामक अदृश्य साखळीद्वारे जीवनावश्यक वस्तूंचा मागणीप्रमाणे घरपोच पुरवठा करण्याचे सेवाभावी कार्य विनामोबदला करत आहेत. प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणाऱ्या संघटनेच्या कार्याविषयी राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेला लेख...

लॉकडाउनमध्ये दिव्यांगांचे जगणे करू सोपे : दिव्यांगांच्या विकासासाठी रत्नागिरीत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षिका सौ. प्रिया अमृत गांधी यांचा लेख

हा डाव साधलेला : बुलबुलने घातलेली अंडी आणि मांजराने साधलेला डाव... धीरज वाटेकर यांचा ललित लेख..

बोली : देव तारी त्याला कोण मारी - डॉ. प्रणव अशोक प्रभू यांनी लिहिलेला संगमेश्वरी बोलीतील लेख

करोना संकट टळल्यावर पुन्हा जाऊ निसर्गाकडे : अॅड. गिरीश राऊत यांचा लेख

... म्हणून घातला करोनाने आपल्याला विळखा : बाबू घाडीगावकर यांचा लेख...

या व्यतिरिक्त वाचक पत्रे, देविदास देशपांडे यांची व्यंगचित्रे, आदी..

संपादक : प्रमोद कोनकर