साप्ताहिक कोकण मीडिया - १५ मे २०२०

Share
  • Document
  • 10 MB
Free
Description

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या एक मे २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/
१५ मे २०२०च्या अंकात काय वाचाल?

संपादकीय : प्रशासनाच्या हतबलतेचा विपर्यस्त अर्थ

मुखपृष्ठकथा : प्रशासनावर खापर, पुढाऱ्यांचे काय? : लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर अनधिकृतपणे आणि अधिकृतपणे येणाऱ्या चाकरमान्यांचा भार जिल्हा प्रशासनाच्या आवाक्याबाहेरचा आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले; मात्र त्यातून प्रशासन हतबल झाल्याचा अर्थ काढून प्रशासनावर खापर फोडणारे पुढारीच या परिस्थितीला जबाबदार आहेत. करोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासन खंबीरच असल्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या साऱ्याचे विश्लेषण करणारा राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख....

लॉकडाउन ३.० संपून ४.० कडे जाताना... जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांचा लेख..

बोली... हटाटिवळेचो धोंडो... बाबू घाडीगावकर यांची मालवणी बोलीतील गजाल...

लॉकडाउन, पोलीस आणि मी... आगरी बोलीतील कथा...

रसग्रहण... अशोक प्रभू यांनी लिहिलेली बालपणातील एक विनोदी आठवण...

पद्मभूषण धनंजय कीर... धनंजय कीर यांच्या नुकत्याच होऊन गेलेल्या स्मृतिदिनानिमित्त मुंबई दूरदर्शनचे निवृत्त सहायक संचालक जयू भाटकर यांनी लिहिलेला लेख...

बालकथा - भविष्य सांगणारी पाल... भावना मेनन यांच्या कथेचा अश्विनी कांबळे यांनी केलेला अनुवाद

याशिवाय कोकणातील काही उल्लेखनीय बातम्या आणि विविध विषयांवर वाचकांनी मांडलेले विचार...