साप्ताहिक कोकण मीडिया - २५ सप्टेंबर २०२०

Share
  • Document
  • 15 MB
Free
Description

Weekly Kokan Media is a Marathi weekly magazine published from Ratnagiri District of Maharashtra. This magazine covers the happenings in Kokan region of Maharashtra state in India. Kokan is the coastal belt of Maharashtra covering Mumbai, Palghar, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts. Kokan Media tries to cover reports regarding maximum aspects including Traditional and linguistic diversity, events, tourism, agriculture, etc. https://kokanmedia.in/

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या २५ सप्टेंबर २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/

या अंकात काय वाचाल?
संपादकीय : जबाबदारी कोणाची? https://kokanmedia.in/2020/09/25/skmeditorial25sep/

मुखपृष्ठकथा : पेपरवाल्यांनाही बसले करोनाचे घाव : करोना, लॉकडाउन, निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी अशा संकटांनी पाठोपाठ सर्वांना तडाखे दिले. सर्वांना कसे फटके बसले, याचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना मात्र किती फटका बसला आहे, यावर फारसं लिहिलं गेलं नाही. या प्रश्नाचा आढावा घेणारा, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेला लेख...

मी केली करोनावर मात : कल्याण येथील ८० वर्षांचे ज्येष्ठ पत्रकार विनायक बेटावदकर यांनी नुकतीच करोनावर मात केली. त्यांचा लेख...

क्वारंटाइन ते मृत्यू.... अनुभवलेला करोना : वडील करोनाबाधित झाले नाहीत तरी त्यांना क्वारंटाइन व्हावं लागणं, बाधा झाल्यामुळे रुग्णालयात दाखल झालेले आजी-आजोबा आणि उपचार सुरू असताना आजोबांचा झालेला मृत्यू आणि आईबरोबरच स्वतःला करोना झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलेल्या वैद्यकीय शास्त्राच्या विद्यार्थ्याने स्वतःच्या अनुभवांवर लिहिलेला लेख...

मुलांची प्रतिकारशक्ती ऑनलाइन वाढणार आहे का : 'करोना डायरी'त किरण आचार्य यांचा लेख...
...
साप्ताहिक कोकण मीडियाच्या ताज्या अंकासह मागील अंक मोफत वाचण्यासाठी https://kokanmedia.in/e-magazine या लिंकवर आमच्या ई-मॅगझिन विभागाला जरूर भेट द्या.
....
साप्ताहिक कोकण मीडिया
व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक https://bit.ly/3iSdcEw

टेलिग्राम लिंक : https://t.me/kokanmedia