साप्ताहिक कोकण मीडिया - २४ एप्रिल २०२०

Share
  • Document
  • 10 MB
Free
Description

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या २४ एप्रिल २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/

२४ एप्रिल २०२०च्या अंकात काय वाचाल?

मुखपृष्ठकथा : करोना - चीनच्या मासळी बाजारातून रत्नागिरीपर्यंत...
ब्रिटनमधील रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे चार्टर्ड सायंटिस्ट असलेले डॉ. रोहन विजय आंबर्डेकर यांनी कोव्हिड-१९ या महामारीची शास्त्रीय माहिती देण्यासाठी लिहिलेला लेख. रत्नागिरीतील कुरतडे हे डॉ. आंबर्डेकर यांचे मूळ गाव आहे.

संपादकीय : पत्रकारांची सुरक्षा वाऱ्यावरच...

स्वातंत्र्य की स्वैराचार?
लॉकडाउनचे उल्लंघन करण्याच्या घटनांबद्दल रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी लिहिलेला लेख...

समाजमाध्यमे व्यापून राहिले करोना वाङ्मय : राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा विशेष लेख..

करोना आणि मयग्याचे हाल! : बाबू घाडीगावकर यांची कथा

ललित लेख -
आईचा श्याम - सौ. सुनेत्रा जोशी, रत्नागिरी
मोठं शहर सोडायचं धाडस न होणाऱ्या सर्वांसाठी - सौ. शिल्पा करकरे, तुरळ

कोकणचे सुपुत्र असलेले वैभव मांगले लॉकडाउनच्या काळात आपल्या गावी चित्रकलेचा छंद जोपासत आहेत. त्याबद्दलचा वृत्तांत...
त्याशिवाय, विविध विषयांवरचे वाचक विचार, कोकणातील उल्लेखनीय बातम्या, इत्यादी...