साप्ताहिक कोकण मीडिया - आठ मे २०२०

Share
  • Document
  • 9 MB
Free
Description

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या एक मे २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/
८ मे २०२०च्या अंकात काय वाचाल?
संपादकीय : 'माझी मुंबई' चाकरमान्यांना सांभाळू शकत नाही?

मुख्यमंत्र्यांचा सहाध्यायी रत्नागिरीत उपयोजित कलेच्या नव्या संधीच्या प्रतीक्षेत.... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच राज ठाकरे जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत असतानाच सदानंद भोगले हेही तेथे शिकत होते. कलाविश्वात विविध ठिकाणी काम करून गेली काही वर्षे ते रत्नागिरीत वास्तव्याला आहेत. लॉकडाउनमुळे सध्या अन्य अनेक कलाकारांप्रमाणेच त्यांचेही रोजगाराचे साधन बंद आहे. कलेतून रोजगाराचे साधन पुनरुज्जीवित होण्याच्या ते प्रतीक्षेत आहेत... त्यांच्याशी साधलेल्या संवादातून मांडलेले प्रश्न...

मुखपृष्ठकथा : चाकरमान्यांच्या घरवापसीचा कल्लोळ : करोनाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी कोकणात परतण्याच्या विषयावरून गेले काही दिवस बरीच चर्चा, घडामोडी सुरू आहेत. त्या विषयाच्या वेगवेगळ्या बाजूंचा राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी घेतलेला आढावा...

करोना आणि आयुर्वेदाची उपयुक्तता : सावंतवाडीतील ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य मुरलीधर प्रभुदेसाई यांचा लेख..

लॉकडाउन, पोलीस आणि मी... आगरी बोलीतील कथा...

कौसल्येक कितवो म्हयनो लागलो... अशोक प्रभू यांचा स्मरणरंजनपर लेख..

लॉकडाउन ३.० .... बाबू घाडीगावकर यांचा ललित लेख...

बालकथा - इच्छाधारी नाग... भावना मेनन यांच्या कथेचा अश्विनी कांबळे यांनी केलेला अनुवाद

याशिवाय विविध विषयांवर वाचकांनी मांडलेले विचार...