साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या २९ मे २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/
२९ मे २०२०च्या अंकात काय वाचाल?
संपादकीय : समन्वयाच्या अभावाचे चटके अधिक
मुखपृष्ठकथा : 'आत्मनिर्भर भारत' ही उद्योजकांसाठी संधीच
करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजमधून कोणाला काय काय मिळू शकेल, हे पॅकेज कसे उपयुक्त ठरू शकेल, याचा ऊहापोह मुंबईतील सीए तेजस पाध्ये यांनी या लेखातून केला आहे.
टाळेबंदीत शोधली संधी...
लॉकडाउन काळाचा सदुपयोग करून विविध नागरिकांनी राबवलेल्या उपक्रमांच्या गोष्टी
- देवरुखच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केले विशेष फेस शील्ड
- धोका पत्करून हापूसच्या ४०० पेट्यांची विक्री
- 'ऑन दी स्पॉट पिंट्या'मुळे दिव्यांग भिकारी झाला उद्योजक...
- वाहनांच्या विम्यासंबंधीची फसवणूक टाळणारा अभ्यासक्रम पूर्ण
- चिंध्यांमधून सावरला संसार
ध्येयनिष्ठ देशभक्त : विनायक दामोदर सावरकर
सावरकरांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करणारा, माधव अंकलगे यांचा लेख...