product-preview-thumbnail-0product-preview-thumbnail-1product-preview-thumbnail-2product-preview-thumbnail-3product-preview-thumbnail-4

बिझनेसच्या भन्नाट आयडिया! (डिजिटल कॉपी)

Share
  • Document
  • 8 MB
₹ 100
Description

वडापावची गाडी टाका, रेस्टॉरंट टाका, फर्निचर बनवा, गवंडीकाम करा, वायरमन व्हा, ड्रायव्हर व्हा, भाजी विका, इडली सांबार विका, दूध घाला, पेपर टाका; जो जमेल, जो मिळेल तो धंदा न लाजता करा.

सध्या अनेक तरुण बेरोजगार आहेत, त्यामुळे लग्नं जुळत नाहीत, त्यामुळे त्यांच्यात मानसिक तणाव दिसून येतो. काहीजण या तणावावर मात करुन पुढे जातात, तर काहीजण व्यसनाचा आधार घेतात. उमेदीचा काळ अशा गोष्टींमुळे वाया गेल्याने नंतर त्यांच्या आयुष्यात संघर्ष सुरु होतो. त्यामुळे मुलांना बिनकामाचे शिक्षण देण्यापेक्षा व्यवसायाभिमुख व कौशल्य प्रदान करणारे शिक्षण दिले पाहिजे. हल्लीच्या मुलांमध्ये नवीन शिकण्याची वृत्ती, धाडस व उच्च क्षेत्रात झेपावण्याचे बळ आहे, त्याची जाणीव त्यांना होणे गरजेचे आहे.

आजकाल अनेक चांगली शिकलेली मुलं, गृहिणी, व्हीआरएस घेतलेले लोक, प्रत्येकाकडे काहीतरी अनुभव, ज्ञान, वेळ व मेहनत करण्याची तयारीही असते पण; नेमकं काय करायचं, कोणता व्यवसाय निवडायचा, तो कसा एकत्र करायचा, ग्राहक कुठून मिळतील, नेमकी प्रोसेस कशी असेल, व्यवसाय करण्यासाठी कोणत्या मूलभूत गोष्टींचे ज्ञान आवश्यक आहे हे सर्व प्रश्न त्यांच्या डोक्यात असतात. या जगात अगणित संधी आहेत, पण बऱ्याच जणांना याची माहिती नसते. या सर्वांसाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकातील बिझनेसच्या १०१ भन्नाट आयडिया वाचून अनेकांचा निश्चितच फायदा होईल. आपल्याला हे पुस्तक आवडलं तर आपण हे पुस्तक आपल्या मित्रमंडळीना, नातेवाईकांना अवश्य वाचायला द्यावं.

पाने - २३२
लेखक - प्रकाश भोसले
किंमत - ₹ १००
नवी अर्थक्रांती प्रकाशन

टीप : पुस्तक नोंदणी झाल्यावर PDF आपल्याला ईमेलद्वारे मिळेल. सोबत एक पासवर्ड मिळेल, पुस्तक वाचण्यासाठी तो टाकावा.

नवी अर्थक्रांतीची इतर पुस्तके विकत घेण्यासाठी - https://bit.ly/nabooks