योगेश सोमण यांची शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी मेकिंग कार्यशाळा - ऑनलाईन
आयोजक - विश्व मराठी परिषद
आता तर तुम्ही मोबाईलवरही शॉर्ट फिल्म बनवू शकता...! आपली कौशल्ये विकसित करा... Additional करिअर संधी...
शॉर्ट फिल्म अर्थात लघुचित्रपट, डॉक्युमेंटरी म्हणजे माहितीपट कार्यशाळा ( प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तरांसाहित )
संकल्पना : प्रा. क्षितिज पाटुकले
मार्गदर्शक : योगेश सोमण ( बहुआयामी अभिनेता, लेखक, पटकथाकार, दिग्दर्शक आणि लघुचित्रपट निर्माता )
कालावधी: पाच दिवस, रोज एक तास
ठिकाण: आपल्या मोबाईलवर
कुणासाठी अधिक उपयुक्त - खरतर सर्वांसाठी ... म्हणजे ज्यांना काही सृजनशील निर्मिती करावयाची अशा सर्वांसाठी आणि सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी उपयुक्त कार्यशाळा.... आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती, संस्था, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच्या गोष्टी, प्रतिष्ठित व्यक्ती, कथा, कादंबरी, परंपरा, रूढी... अशा विविध गोष्टींवर आपण डॉक्युमेंटरी तयार करू शकता, आपण जगातील कोणत्याही विषयांवर लघु चित्रपट बनवू शकता.
शहाण्या आणि हुशार माणसांना सध्याच्या काळात लघुचित्रपट आणि डॉक्युमेंटरी निर्मिती मध्ये चांगली संधी आहे...कारण तंत्रज्ञान खूप सोपे झाले आहे...
कार्यशाळेतील विषय
१) शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी म्हणजे काय ? फरक कोणता ?
२) शॉर्ट फिल्मची स्टोरी कशी बनवायची ? स्टोरीचे महत्व
३) स्टोरीवरून स्क्रिन प्ले कसा तयार करायचा ? संवाद कसे तयार करायचे ?
४) शूटिंग कसे करायचे ? कॅमेरा आणि त्याचे विविध अँगल
५) दिग्दर्शन कसे करायचे ? दिग्दर्शिय कौशल्ये...
६) निर्मिती नंतरची एडिटिंग प्रक्रिया
७) फायनल शॉर्ट फिल्म - रेडी टू ब्रॉडकास्ट
८) शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरीचा कालावधी किती असावा आणि कसा ठरवावा ?
९) शॉर्ट फिल्म कुठे आणि कशी प्रदर्शित करायची ? त्याची नोंदणी कुठे करायची ?
१०) शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी चे आर्थिक गणित
११) शॉर्ट फिल्म महोत्सव - राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय
१२) शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी निर्मितीमध्ये करिअर संधी
सहभाग शुल्क : रु. ९९९/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात १०% सवलत
सर्व सहभागींना प्रमाणपत्र मिळेल...
मर्यादित प्रवेश – त्वरित ऑनलाईन नोंदणी करा…