Netbhet

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स - सोशल मिडीयाचा प्रभावी वापर

Share
₹ 500
Description

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स - सोशल मिडीयाचा प्रभावी वापर

नेटभेट आपल्यासाठी घेऊन आले आहेत एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी/व्यवसायासाठी महत्वाचा "सोशल मीडीयाचा प्रभावी वापर" (SOCIAL MEDIA POWER TIPS ) कोर्स. मित्रहो सोशल मीडीया आता केवळ मनोरंजंनाचा एक भाग राहिलेला नाही. आता सोशल मिडीयाकडे एक प्रभावी बिझनेस टूल किंवा पर्सनल ब्रँडींग टूल म्हणून पाहिले पाहिजे.

आणि फेसबूक, ट्वीटर इत्यांदीवर आपला वेळ उगाचच वाया न घालवता या साईट्सचा उपयोग आपले करीअर पुढे नेण्यासाठी किंवा व्यवसाय वाढविण्यासाठी कसा करता येईल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आणि म्हणूनच फेसबूक, ट्वीटर, गुगल प्लस सारख्या सोशल साईट्स वापरणार्‍या प्रत्येकासाठी हा कोर्स आहे. हा कोर्स तुम्हाला सोशल मिडीया कसा वापरावा ते सांगत नाही, हा कोर्स "सोशल मिडीया प्रभावीपणे कसा वापरावा? ते सांगतो.

या कोर्सद्वारे आपण आपले प्रोफाईल कसे असावे ? प्रोफाईल फोटो कसा असावा ? चांगल्या पोस्टस कशा लिहाव्यात ? चांगल्या पोस्ट्स लिहिण्यासाठी काय करावे ? याबद्दल माहिती मिळवू शकतो.
तसेच सध्या उपलब्ध असलेल्या सर्व प्रसिद्ध सोशल मिडीया साईटस जसे की फेसबूक, ट्वीटर, गुगल प्लस, लिंक्ड-इन, पिंटरेस्ट, इंस्टाग्राम सर्व साईट्स मध्ये काय वेगळं आहे आणि ते आपण कशा प्रकारे वापरले पाहिजे हे देखिल या कोर्समध्ये पहायला मिळेल.
आणि सगळ्यात ​शेवटी आपला व्यवसायाच्या वाढीसाठी सोशल मिडीयाचा कसा फायदा करून घेता येईल ते आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत.

या कोर्स मध्ये भरपूर व्हिडिओंचा वापर केला आहे ज्यामुळे कोर्स समजणे सोपे आहे. आपल्याला वेळ मिळेल तसा हा कोर्स तुम्ही करू शकता. अगदी आपल्या वेगाने. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही ! घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही आणि केव्हाही शिकता येण्यासारखा हा कोर्स आहे.

घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हा कोर्स तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता.

​आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच, कोर्स पूर्ण झाल्या नंतरही आम्ही मदतीला असूच !