बिझनेस प्लान कसा तयार करावा ? (Marathi Course By Netbhet)

Share
Min ₹ 3,500
Description

तुम्हाला बिझनेस सुरु करायचा आहे का ?
किंवा सुरु केलेला बिझनेस आता पुढच्या पातळीवर घेऊन जायचा आहे ?
बिझनेस वाढविण्यासाठी तुम्हाला बँकेकडून कर्ज उभं करायचं आहे ?
गुंतवणुकदारांकडून आपल्या व्यवसायात गुंतवणुक मिळवायची आहे?
उद्योगाचं मार्केटिंग, ऑपरेशन्स आणि फायनान्शीयल प्लानिंग करायची आहे?
वरील प्रश्नांपैकी कोणत्याही एका (किंवा सर्वच!) प्रश्नांचं उत्तर "होय" असं असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात !

वरील सर्व प्रश्नांच्या उत्तराची सुरुवातच मुळात "बिझनेस प्लान" या शब्दाने होते. आपल्या व्यवसायात गुंतवणूकदारांना आकर्षित करणारा आणि उद्योजकाला सतत मार्गदर्शन करणारा योग्य "बिझनेस प्लान" कसा तयार करावा ? हे बर्‍याच उद्योजकांना माहित नसते.

नेटभेटच्या "बिझनेस प्लान कसा तयार करावा?" या ऑनलाईन कोर्स मध्ये हेच सोप्या मराठीतून आणि अनेक उदाहरणांसहित शिकविण्यात आलेले आहे.

कोर्सची उद्दीष्टे -
१. आपली बिझनेस आयडीया ग्राहकांचे नक्की कोणते प्रश्न सोडवते ते ठरवणे
२. आपले उत्पादन / सेवेचे स्वरुप कसे असेल आणि रेव्हेन्यु मॉडेल काय असेल ते ठरवणे
३. ग्राहक आणि बाजारपेठेचा अभ्यास कसा करावा ?
४. स्पर्धकांचा अभ्यास कसा करावा ?
५. मार्केटिंग प्लान तयार करणे
६. सेल्स प्लान तयार करणे
७. उत्पादन / सेवेची योग्य किंमत ठरवणे
८. ऑपरेशन्स प्लान तयार करणे
९. फायनान्शियल प्लान तयार करणे (बॅलन्स शीट , सेल्स फोरकास्ट, प्रॉफिट आणि लॉस अकाउंट)
१०. एकुण गुंतवणुकीची गरज किती आहे ते ठरविणे
११. २५+ विविध उद्योगांच्या बिझनेस प्लानचे नमुने (इंग्रजीमध्ये)

हा कोर्स कुणासाठी -
- स्वतःचा उद्योग सुरु करु इच्छीणार्‍या व्यक्तींसाठी
- व्यवसायामध्ये गुंतवणुक आणण्यासाठी
- व्यवसाय सुरु करण्यासाठी गुंतवणुक किंवा बँक कडून कर्ज मिळवू इच्छीणार्‍या उद्योजकांसाठी
- आपल्या व्यवसायाची पुढील ३ वर्षांची सर्वांगिण योजना बनवू इच्छीणार्‍या उद्योजकांसाठी
- बिझनेससाठी योग्य स्ट्रॅटेजी बनवू इच्छीणार्‍या उद्योजकांसाठी