उद्योजक सूची नोंदणी

Share
₹ 150
Description

महाराष्ट्रातील उद्योजकांची जिल्हावार ‘उद्योजक सूची’ तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘स्मार्ट उद्योजक’ने हाती घेतला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात लहान-मोठा उद्योग करणार्‍या प्रत्येक उद्योजकाची नोंद या सूचीमध्ये करण्याचा मानस आहे. ‘स्मार्ट उद्योजक’च्या संकेतस्थळावर (उद्योजक डॉट ऑर्ग) ही सूची सर्वांसाठी उपलब्ध आहे व आगामी काळात ई-बुक रूपातही याचे खंड प्रकाशित केले जाणार आहेत.

या उद्योजक सूचीमध्ये उद्योजकाचे नाव, पत्ता, त्याच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती, त्याच्या प्रॉडक्ट किंवा सेवेविषयी तसेच उद्योजकाही माहिती देता येते. ही उद्योजकाची एक परिपूर्ण प्रोफाइल तयार होऊ शकेल. ही वेब बेस्ड असल्यामुळे उद्योजकाच्या नावे स्वतंत्र वेबपेज तयार होईल. या प्रकल्पाचा एक उद्देश मराठी उद्योजकांना समाजात अधिकाधिक visibility मिळावी हा असल्यामुळे ‘मराठी उद्योजक’ या फेसबुक पेजवर प्रसारित केले जाईल.

‘उद्योजक सूची’ तयार करण्यासाठी संपादकीय व तांत्रिक काम सांभाळण्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि होस्टिंग तसेच अन्य खर्च यांचा विचार करून फक्त ₹१५० ठेवण्यात आलेली आहे. Processing Fee भरल्यानंतर आपण एका वेब बेस्ड फॉर्मवर पोहोचाल. तो फॉर्म संपूर्ण भरून सोबत फोटो जोडावा. लवकरच तुमची उद्योजक सूची प्रसिद्ध केली जाईल.